शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक

नागपूर : २७ सप्टेंबर – राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंटस हॅक करण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतं आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची सकाळी माहिती पुढे आली. टर्किश सेक्युरिटी आर्मी नावाचा उल्लेख त्यात दिसून येत आहे …नागपूर सायबर सेल कडे खासदार तुमाने यांनी तक्रार दाखल केली.
सोशल मीडियावर सामान्य जनतेची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता थेट खासदाराचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. खासदार कृपाल तुमाने यांचं फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानं सायबर सेल कामाला लागला आहे.

Leave a Reply