आता राहुल गांधीही झाले कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : २० एप्रिल – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

Leave a Reply