केंद्र सरकारने अँमेझॉन कडून ८५४६ कोटींची लाच घेतल्याचा रणदीप सुरजेवाला यांचा आरोप

नवी दिल्ली : २२ सप्टेंबर – काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी विविध मुद्द्यांच्या आधारे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी ई-कॉमर्स अँमेझॉन बाबतीत लाचखोरीचा आरोप केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत गप्प का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुरजेवाला यांनी या प्रकरणात सात प्रश्न उपस्थित केले आहेत. रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबत ट्वीट देखील केले आहे. त्यांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘विदेशी ई-कॉमर्स कंपनी अँमेझॉनने गेल्या दोन वर्षात भारतात कायदेशीर शुल्काच्या नावे ₹८,५४६ कोटी रुपयांचं पेमेंट केलं आहे. हे पैसे कथितपणे लाच म्हणून देण्यात आल्याचे आता समोर आले आहे.’
अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने गेल्या दोन वर्षांत भारतात कायदेशीर शुल्काच्या नावाखाली ८,५४६ कोटी रुपयांच्या कथित लाच दिल्याच्या अहवालावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर मागितले आहे. रणदीप सुरजेवाला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला काही सवाल केले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी अशी मागणी केली.

Leave a Reply