महंत नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत, त्याची हत्या करण्यात आली – खा. साक्षी महाराज

नवी दिल्ली : २२ सप्टेंबर – महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कथित चिठ्ठी बनावट आहे. नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणाचीसंपूर्ण चौकशी सीबीआयद्वारे करावी. महंत नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत. त्याची हत्या करण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा भाजप खासदार साक्षी महाराजांनी केला आहे.
कथित सुसाइड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी ज्या बलवीर गिरी यांना उत्तराधिकीर बनवण्याचं लिहिलं आहे, त्यांनी आपल्या गुरूच्या हस्ताक्षरावरून दोन वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. नरेंद्र गिरींच्या कथित सुसाइड नोटमधील हस्ताक्षर हे आपल्या गुरुंचेच आहे, असं बलवीर गिरी मंगळवारी म्हणाले होते. पण आज त्यांना हस्तक्षराबाबत विचारण्यात आलं, तर त्यांनी ते ओळखण्यास नकार दिला.
नरेंद्र गिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोस्टमार्ट रिपोर्टमध्ये म्हटल्याचं सांगण्यात येत आहे. पण पुढील तपासासाठी व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहावर बुधवारी पोस्टमार्ट झाले. जवळपास अडीच तास पोस्टमार्टम सुरू होते. पोस्टमार्टम रिपोर्ट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सीलबंद पाकिटात देण्यात आला आहे.

Leave a Reply