मी आपल्या वक्तव्यावर ठाम – सुनील केदार

नागपूर : २१ सप्टेंबर – काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना लाथा हाणा अशी चिथावणी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली. यावर मंत्री सुनील केदार यांना विचारले असता त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. केदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रविवारी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकी संदर्भात आयोजित पक्षाच्या बैठकी दरम्यान बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री सुनील केदार म्हणाले की, कॉंग्रेसचा कितीही मोठा नेता असेल आणि पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा हाणा, तुमच्यावर पोलीस केस झाली, तर मी पाहून घेईन, असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.
यात बैठकीत केलेले माझे वक्तव्य आधीच रेकॉर्डवर आहे. त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करायची गरज नसल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार म्हणाले. माझे वक्तव्य रेकॉर्डवर असल्याने त्यात आणखी काय बोलायचे असे ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेस पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना लाथा हाणा या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत

Leave a Reply