गणेश चित्र स्पर्धेत हर्षवर्धन आणि हर्षिता अव्वल

नागपूर : २१ सप्टेंबर – श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून सोहम बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विघ्नहर्ता श्रीगणपतीच्या चित्रांची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून त्यात १५ वर्षाखालील गटात हर्षवर्धन भानवसे, अद्वैत नियोगी, वेदांत काटकर तर १५ वर्षावरील गटात हर्षिता हेलीवाल, प्रिशिका पिल्ले व कस्तुरी बेलन विजेते ठरले.
या स्पर्धेसाठी १५ वर्षाखालील व १५ वर्षावरील असे दोन गट तयार करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धसाठी एकूण ७२ प्रवेशिका आल्या होत्या. स्पर्धेनंतर दुर्गा माता मंदिर सोनेगाव येथे आयोजित छोटेखानी समारंभात संस्थेच्या सचिव श्रुती देशपांडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी कलावंतांनी श्री गणेशाच्या चित्रासह सुरेख आणि सामाजिक उत्तेजनार्थ संदेश देखील लिहून पाठविले होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष रोशन इंगळे, सहसचिव योगेश काकडे, पूजा नायडू यांच्यासह सर्व पदाधिकार्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष देवदत्त पंडित यांनी केले।

Leave a Reply