मुंबई : १९ सप्टेंबर – भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केली आहे. आज कोल्हापूरला निघाले असता पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. त्यानंतर मला कितीही अडवलं तरी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच’ असं चॅलेंजच सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहे. आज ते कोल्हापूरला रवाना होणार होते. पण, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल, असं म्हणत नोटीस बजावली आहे. त्यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
‘ठाकरे सरकारची ही गुंडगिरी आहे. पोलीस दडपशाही आहे. माझा घराखाली पोलिसांची गर्दी केली आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला मुलुंडच्या माझा घरातून अटक करण्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे, असा आरोपच सोमय्यांनी केला आहे.