दिल्लीत महिला आयोगाच्या अध्याक्षांचा विनयभंग करत नेले गाडीने फरफटत

नवी दिल्ली : १९ जानेवारी – काही दिवसांपूर्वी कारने काही अंतर फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्या घटनेची चौकशी पूर्ण होत नाही तोचं आता दिल्लीत कारने चक्क महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेमुळे दिल्लीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून या घटनेला दुजोरा दिला आहे.
या घटनेत मालीवाल थोडक्यात बचावल्या असून, मालीवाल यांनी मद्यधुंद कार चालकाने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली एम्सच्या गेट नंबर दोनसमोर कारने मालीवाल यांना धडक दिली तसेच त्यांना १० ते १५ मीटरपर्यंत ओढत नेले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे 3.11 वाजता घडली. कार चालकाने खिडकीबंद केल्याने हात अडकला. त्यावेळी कारचालकाने साधारण १० ते १५ मीटरपर्यंत ओढत नेले.
याप्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय कारचालक हरिश्चंद्रला अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
या प्रकरणावर स्वाती मालीवाल यांनी ट्वीट केले आले. गुरुवारी रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी एका ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला. त्याला पकडले असता त्याने माझा हात गाडीच्या खिडकीत अडकवत कारसोबत साधारण १० ते १५ मीटर फरफटत नेले.
दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला असे म्हणत त्यांनी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नसतील तर काय परिस्थिती असेल याची कल्पना करा असे मालीवाल यांनी म्हटले आहे.

Leave a Reply