तीय गुया चा लाळू – मनोज वैद्य

शायेतून घरी आलो का मोठ्या खल बत्त्यात तियगुय कुट्टत माय दिसे. माह्या नाकात त खमंग वास जाय पन माह लक्ष पतंगीत राहे. कवेळू च घर होतं म्हणून बाजूच्या टीने वर बावाजी चढवून दे आम्हाले. तीन चार घंटे उतरवेच नाय. आम्हाला सपाटून जेव्हा शी-सु लागे तेव्हाच उतरवे. तोपर्यंत माय लाळू बनवून ठेवे व आम्हा भौ बहिणीचा एक-एक लाळू बाजूले ठेऊन बाकीचे चुपचाप लपवून ठेवे. मले तियगुल लय आवडे. मंग अंधार दाटला का आम्ही टीनेवरून खाली उतरो. दिवसभर उन्हानं अन थंडीनं चेहरा त असा झालेला दिसे जसा चुलीवरचा भाजला आलू. मंग आंग हातपाय धुतले का बारीक मंधी डबे हुडको. हाताले लाळू लागले का मुठीत जेवढे बसे तेवढे घेऊन पयुन जावो अन मागच्या गल्लीत मस्त खाऊन घेवो. माय ले वाटे थेच हुशार पण मी जरा जास्तच हुशारी दाखवो. रात्री झोपताना मले म्हणे,” एकच लाळू खाल्ला न मा” मी नम्र पणे ” हो, एकच खाल्ला, तू न कुठं दिला दुसरा…..” मंग सकाळी “तिकडं” जावो त लढतच बाहेर येवो. ” का रे का झालं” माय इशारे. आता सांगू का इले असा प्रश्न पडे. आग जशी वाढे तसे मले लाळू आठवे. माय च्या त कवाच लक्षात आलेलं राहे का पोराईनं चोरून लाळू खाल्ले म्हणून. मंग औषध गिन दिलं का मांग थंड वाटे. लहान भाऊ व बहीण मले पाहून उबडे पडू पडू हासे. मले इशार्यानं थो लाळू चा डब्बाच दाखवे. माही चांगली शेकली होती तवा पासून मी कोणालेच म्हणत नाय ,”तियगुय घ्या न गोड बोला” म्हणून.

मनोज वैद्य, नागपूर
9822949260

Leave a Reply