ब्राझीलमधील परिस्थितीवर बोलण्यापेक्षा पंतप्रधानांनी भारतातील सद्यस्थितीवर बोलायला हवे – नाना पटोले

नागपूर : ११ जानेवारी – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून लक्ष्य करीत असल्याचे दिसून येते. नागपुरात प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारणीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी एक वक्तव्य ऐकत होतो. ते ब्राझीलच्या निवडणुकीवर बोलत होते. ब्राझीलमध्ये निवडणुकीत पराभव झालेल्यांनी तेथील राष्ट्रपती भवन आणि संसद भवनावर हल्ला केला. अशा प्रकारचा हल्ला लोकशाहीसाठी बरोबर नाही असे पंतप्रधान सांगत होते. पण, त्यांनी ब्राझीलच्या परिस्थितीवर बोलण्यापेक्षा भारतात सध्यास्थिती आहे. त्यावर आपली भूमिका मांडली पाहिजे.
आज भारतामध्ये लोकशाहीचे वातारण राहिले नाही. मोदी सरकार आणि न्यायलालिका यांच्यात भांडणे सुरू आहेत. या काळात निवडणूक आयोग आणि प्रशासकीय व्यवस्था सुरक्षित नाही. सरकारने प्रत्येक संविधानिक संस्था खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा अवस्थेत लोकशाही टिकून राहणे कठिण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून भारत जोडो यात्रा काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या लोकशाहीवर बोलण्याआधी भारताच्या आजच्या परिस्थतीवर भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे.

Leave a Reply