संपादकीय सांवाद – धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत स्वागतार्ह

या देशात धर्मांतराचा मुद्दा हा गंभीर मुद्दा आहे, त्यामुळे सक्तीचे धर्मांतर तसेच आमिष किंवा लालूच दाखवून केलेले धर्मांतर हे प्रकार अवैधच आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे मत स्वागतार्हच म्हणावे लागेल.
या देशात आठव्या शतकापर्यंत फक्त हिंदू धर्म अस्तित्वात होता, त्याच काळात कधीतरी बौद्ध धम्म, अस्तित्वात आला. मात्र बौद्ध धम्म आणि हिंदू धर्म यात कधीही फारसा संघर्ष नव्हता, इतिहासात डोकावल्यास नंतरच्या काळात बैद्ध धम्म हा भारताबाहेर चीन, जपान, कोरिया, अश्या भागातच जास्त फोफावला होता, याच काळात जैन, आणि शीख पंथही पुढे आले. पारशी देखील याच दरम्यान आले. मात्र इथे कुठेही संघर्ष नव्हता . परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रकारही नव्हता.
आठव्या शतकानंतर भारतात मुस्लिमांचे आक्रमण सुरु झाले. मुस्लिमांनी मात्र देशात धर्मांतर सुरु केले. तलवारीच्या जोरावर त्या काळात मुस्लिमांनी अनेक हिंदूंना बळजबरीने मुस्लिम बनायला लावले. मुस्लिम राजे आणि सरदारांनी हिंदूंच्या बायका पळवून नेत त्यांच्याशी बळजबरीने निकाह लावले. त्यांना होणारी संतती ती सगळी मुस्लिमच निपजली.
साधारणपणे पंधराव्या शतकाच्या दरम्यान व्यापारासाठी इंग्रज इथे आले, हळूहळू त्यांनी देशाची सत्ता काबीज केली. या इंग्रजांनीही भारतात ख्रिस्तीकरण करणे हे अहम कर्तव्य ठेवले . मुस्लिम तलवारीच्या धाकावर धर्मांतर करायला लावत होते, ख्रिश्चनांनी लालूच दाखवून आणि अज्ञानाचा फायदा घेऊन अनेकांना ख्रिश्चन बनवले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ही परिस्थिती बदलेल असी वाटले होते. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मतांचे राजकारण करत ख्रिश्चन आणि मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यातच धन्यता मानली. त्यामुळे गेल्या ७४ वर्षात धर्मांतरं थांबलेले नाही. हे धर्मांतारण हिंदू धर्मातूतनाच केले जात असून ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मांमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केले जात आहेत. परिणामी हिंदू समाजात कायम अस्वस्थता वाढीलाच लागली आहे.
२०१४ नंतर देशात भाजपशासित राज्ये सत्तेवर येण्याची प्रक्रिया वाढीला लागल्यानंतर असे धर्मांतरण रोखण्याचा प्रयत्न होतो आहे, मात्र जिथे भाजप शासित राज्ये नाहीत तिथे विरोधही केला जातो आहे. तामिळनाडूमध्ये अश्या विरोधामुळेच निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयासमोर ही याचिका आलेली आहे.
आपल्या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन हे आजही आपल्या धर्मविस्तारासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांचे परदेशातील मायबापही सर्वप्रकरची मदत देत असतात. त्या तुलनेत हिंदू समाज फारसा आक्रमक नाही परिणामी हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटती आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता सक्तीने फसवून किंवा अज्ञानाचा फायदा घेत आमिषे दाखवून केलेले धर्मांतर हे कायद्याने अवैध ठरवण्याची वेळ आलेली आहे. एखाद्याला एखादा धर्म मनापासून पटला तर त्याला आपला धर्म त्यागून त्या धर्मात जाण्याची परवानगी असावी मात्र सक्तीने केलेले धर्मांतर रोखायलाचक हवे.
त्याचबरोबर गेल्या हजार वर्षात अश्या प्रकारे सक्तीने किंवा अज्ञानाचा फायदा घेत आणि आमिषे दाखवून केलेले जे धर्मांतर असेल ते धार्मांतर पूर्वलक्षी प्रभावाने रद्दबातल ठरवून किंवा अश्यांना जर मूळ धर्मात परत यायचे असेल तर त्यांना धर्मांतर करण्याची परवानगी दिली जायला हवी. एकूणच अश्या प्रकारचे अवैध धर्मांतर थांबवायला हवे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त करून हे स्वागतार्ह पाऊल उचलले आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply