अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही – अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल

मुंबई : १० जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच गोपीचंद पडळर यांच्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार चांगलेच संतापले. पहिल्यांदा त्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. गोपीचंद पडळकर अजित पवारांवर थेट टीका करत असतात.
बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे आहेत, दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्ष राज्य केलं पण विकास केला नाहगी. ते जाणता राजा नाही तर नेमता राजा आहेच. काका पुतण्याची एकच टोळी राज्यात आहे, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी काल नाशिक येथे बोलताना केली होती. यावर अजित पवार यांनी प्रश्न विचारण्यात आला.
अजित पवार म्हणाले, “अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्या (गोपीचंद पडळकर) व्यक्तिच्या संदर्भात मी उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्याने कोणताही प्रश्न उपस्थित केला तर तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन त्याला परत पाठवले आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावर अजित पवार म्हणाले, “राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी सहन करणार नाही.”
“सरकार मुळ विषयावरुन लक्ष हटवण्यासाठी नको तो वाद उकरून काढत आहे. राजकीय सूडापोटी कारवाई करणे चुकीचे आहे. सत्ताधारी पक्ष वेगळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असा आरोप अजित पवार यांनी केला.

Leave a Reply