द डे ऑफ द जकॉल – धनंजय केशव केळकर

आमच्या तरुणपणी, द डे ऑफ द जकॉल हा सिनेमा आला होता.
फ्रांसमधील पंचमस्तंभी, म्हणजे आजच्या भाषेतील लीब्रांडू वगैरे, त्यांची एक गुप्त मिटिंग झाली. फ्रान्सच्या गुप्तहेर खात्याची त्यांच्यावर नजर होतीच.
हे असे लोक पकडायचे नसतात. नाहीतर दुसरे कोण येतील कोणास ठावूक.
तर त्यांच्या घराचा नोकर बाहेर पडल्यावर पोलिसांनी त्याला पकडला. त्याला मिटिंग मध्ये प्रवेश नव्हताच. थर्ड डिग्री दिल्यावर म्हणाला, चहा, पेय, द्यायला गेल्यावर त्याच्या कानावर एकच शब्द पडला. तो त्याने सांगितला.
द जकॉल
या एका शब्दावरून पोलिसांनी लगेच निष्कर्ष काढला, दगॉलची हत्या करण्याचा कट आखला जातोय. सुपारी द जकॉल नावाच्या माणसाला दिलेली आहे.
लगेच एक टास्क फोर्स निर्माण केला जातो. आणि त्याला ऐनवेळी गोळी घालून मारण्यात येते. गुपचूप पुरण्यात येते.
कोर्ट पुरावा वगैरे भानगडच नाही. त्याने एक गोळी दगॉलवर झाडलेली असत्ते. पण ती बर्फाची असते. ड्राय आईसमध्ये ठेवून आणलेली असते. पुरावा कसा मिळणार? कोर्टात काय सांगणार?
कसे सिद्ध करणार. मारला आणि पुरला. विषय संपला. नशिबाने ऐनवेळी दगॉल वाकतात आणि वाचतात.
मागील लेखात मी अशा अनेक संशयास्पद घटनांची यादी लिहिली होती. पण नागपुरी रेम्याडोक्यांना मीच नक्षलवादी वाटलो होतो.
आमचाही एक पाळीव नक्षली आहे. असेही त्यांना युजफुल इडीयट म्हणतात. हा इडीयटही आहे.
एक दिवस हा म्हणाला, “सुरतेत पूल पडला, खूप लोक मेली. आता मोदी येईलना भेटायला?”
मी लगेच सावध झालो, म्हणालो, “मोदी कशाला? तिकडचे मुख्यमंत्री जातील तिकडे. “लगेच न्यूज चेक केली. मोदींचा गुजराथेत निवडणूक दौरा चालू होता.”
योग्य ठिकाणी मेसेज पाठवणार इतक्यात साहेब परतले. म्हणाले, “मोदी घाबरला. त्या लोकांना भेटायला गेलाच नाही.” पुढे त्यांच्या सभेचा मांडव पाडण्याचा प्रयत्न झालेला व्हिडिओ पाहिलाच असेल.
सध्या जनतेनेही फार जागरूक राहणे आवश्यक आहे. जरा कोणाच्या बोलण्यात काही वेगळे आले, कि सावध होऊन त्याचा अतापता काढला पाहिजे.
पण…….. जाउद्या..!!
ट्विन टॉवर वर हल्ला झाल्यानंतर फ्रांसने तटबंदी एव्हढी मजबूत केली की असे हल्ले करायला दारुगोळा फ्रांस मध्ये आणताच येईना.
मग शेवटी. गर्दीत गाड्या घुसवून मास मर्डर सुरु केले दहशतवाद्यांनी.
आपले माजी हेर खात्याचे प्रमुख आणि माजी उपराष्ट्रपती, आपल्या अतिगुप्तहेरांचा आतापता शत्रू राष्ट्राला देतात. आणि वर मिरवतात. देशद्रोहाची कडक कलमे सुद्धा न लागता मोकळे फिरत आहेत.
वर पुस्तकेही लिहितात. आपले अडीचशेच्या वर अतिगुप्तहेरांचे जाळे नष्ट झाले.
त्यांचे काय करायला हवे???

धनंजय केशव केळकर
गोरेगाव पूर्व, मुंबई.
9833410231

Leave a Reply