अंजली गाडीखाली अडकली असल्याचं माहिती होतं – अपघात प्रकरणात नवा खुलासा

नवी दिल्ली : ८ जानेवारी – दिल्लीतील हीट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ज्यात एका बलेनो कारने अंजली नावाच्या तरुणीला 12 किलोमीटर फरफटत नेलं, ज्यात तरुणीचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. अशातच आता दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंझावाला प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आरोपींनी पोलीस चौकशीत हे मान्य केलं आहे, की अंजली गाडीखाली अडकली असल्याचं त्यांना माहिती होतं, मात्र भीतीमुळे ते आपली गाडी वेगात चालवत राहिले.
यादरम्यान कंझावालापर्यंतच्या रस्त्यावर त्यांनी अनेकदा यू-टर्न घेतला. आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितलं की, त्यांना भीती होती, की त्यांनी तरुणीचा मृतदेह गाडीखालून काढला तर त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होईल आणि ते या प्रकरणात अडकतील.
या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी पोलीस चौकशीत मान्य केलं, की भीतीमुळेच त्यांनी अपघातानंतर गाडी थांबवली नाही तसंच अंजलीला गाडीखाली बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला नाही. आरोपी खूप घाबरले होते आणि याच कारणामुळे ते वारंवार आपली गाडी तिथेच फिरवत होते. तरुणीचा मृतदेह गाडीच्या खालून निघेपर्यंत कुठे जायचं, हेदेखील समजत नव्हतं, असं आरोपींनी सांगितलं. त्यांनी आधी पोलिसांनी म्यूजिकचा आवाज मोठा असल्याची जी कहाणी सांगितली होती, ती खोटी होती.
आरोपींनी पोलिसांना सांगितलं, की भीतीमुळे ते गाडी घेऊन पळाले. मात्र थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना वाटलं की तरुणी गाडीखालीच अडकली आहे. यानंतर त्यांनी हा मृतदेह रस्त्यावर पाडण्यासाठी ४ वेळा यूटर्न घेतला. मध्येच त्यांनी गाडी खूप वेगात पळवली. आरोपींना माहिती होतं, की हरियाणाकडे गेल्यास चेकिंग होऊ शकते. यामुळे १३ किलोमीटरच्या रस्त्यावर पोलिसांची चेकिंग नसल्याने आरोपी कंझावाला रोडवरच टर्न घेऊन गाडी तिथेच चालवत राहिले. दोन तासात आरोपींनी १३ किलोमीटरच्या रस्त्यावरच वारंवार टर्न घेत ४० ते ५० किमोमीटर गाडी पळवली. यादरम्यान आरोपी आशुतोषसोबत सतत फोनवर बोलत होते, नंतर आरोपींनी त्याच्या घरी गाडी लावली होती.

Leave a Reply