सफर विज्ञानविश्वाची – अभय सावंत

आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत उगा कोणाच्या नावानी महिने वगैरेंचा संबंध नाहीच…

म्हणजे ज्या नक्षत्रात त्या महिन्याची पौर्णिमा येते त्या नक्षत्रावरुनच तो महिना ओळखला जातो.

चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो चैत्र,

विशाखा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो वैशाख,

ज्येष्ठा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो ज्येष्ठ,

पुर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो आषाढ,

श्रवण नक्षत्रातील पौर्णिमा असते तो श्रावण,

पुर्वा भाद्रपदा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो भाद्रपद,

अश्विन नक्षत्रातील पौर्णिमा असते तो आश्विन,

कृत्तिका नक्षत्रातील पौर्णिमा असते तो कार्तिक,

मृगशिर्ष नक्षत्रातील पौर्णिमा असते तो मार्गशीर्ष,

पुष्य नक्षत्रातील पौर्णिमा असते तो पौष,

मघा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो माघ,

पुर्वा फाल्गुनी किंवा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील पौर्णिमा असते तो फाल्गुन.

त्या नंतर असतो दिवस त्याला आपण तिथी महणतो आणी ती रवि व चंद्रा च्या अंतरावर असते म्हणजे रवि पासुन चंद्र १२° पुढे गेला कि एक तीथी…

अमावस म्हणजे दोनीही एकाच अंशात म्हणजे एकत्र असतात तो दिवस म्हणजे म्हणून अमा म्हणजे एकत्र वस म्हणजे वास म्हणजे एकत्र सहवास म्हणून अमावस …

त्या नंतर १२° चंद्र म्हणून प्रतिपदा
त्या नंतर २४° चंद्र म्हणून द्वितीया
त्या नंतर ३६° चंद्र म्हणून तृतीया
त्या नंतर ४८° चंद्र म्हणून चतुर्थी
त्या नंतर ६०° चंद्र म्हणून पंचमी
त्यानंतर ७२° चंद्र म्हणून षष्ठी
त्या नंतर ८४° चंद्र म्हणून सप्तमी
त्या नंतर ९६° चंद्र म्हणून अष्टमी
त्या नंतर १०८° चंद्र म्हणून नवमी
त्या नंतर १२०° चंद्र म्हणून दशमी
त्या नंतर १३२° चंद्र म्हणून एकादशी
त्या नंतर १४४° चंद्र म्हणून द्वादशी
त्या नंतर १५६° चंद्र म्हणून त्रयोदशी
त्या नंतर १६८° चंद्र म्हणून चतुर्दशी
त्या नंतर १८०° चंद्र म्हणून पौर्णिमा

अश्या दोन म्हणजे
पौर्णिमे पर्यंत वाढत जाणारी चंद्र कला तो शुक्ल पक्ष व
आमावस पर्यंत कमी होत जाणारी चंद्र कला तो कृष्ण पक्ष

म्हणजे पृथ्वी भोवती चंद्राची पुर्ण ३६०° प्रदक्षिणा व त्याचे रवी पासुनची अंशात्मक स्थिती नुसार असते त्यावरुन त्याची तीथी हि त्या दिवसाची ओळख

आणी सुर्योदयापासुन ज्या ग्रहाचा पहिला होरा असेल त्या ग्रहावरुन त्या दिवसाचे नांव

सुर्योदयापासुन रवी ग्रहाचा पहिला होरा म्हणून रविवार
सुर्योदयापासुन चंद्र म्हणजे सोम ग्रहाचा पहिला होरा म्हणून सोमवार
सुर्योदयापासुन मंगळ ग्रहाचा पहिला होरा म्हणून मंगळवार
सुर्योदयापासुन बुध ग्रहाचा पहिला होरा म्हणून बुधवार
सुर्योदयापासुन गुरु ग्रहाचा पहिला होरा म्हणून गुरवार
सुर्योदयापासुन शुक्र ग्रहाचा पहिला होरा म्हणून शुक्रवार
सुर्योदयापासुन शनी ग्रहाचा पहिला होरा म्हणून शनीवार

तसेच रात्रीचे तीन भाग करून, त्यांपैकी पहिले दोन भाग अलीकडील दिवसात घेतात व तिसरा भाग पुढच्या दिवसात घेतात. (म्हणजे रात्री 2 ते 2।। या वेळी वार बदलतो.)

असे इतके सोप साध खगोलीय गोष्टिंशी निगडीत कालगणना आहे…

बाकीचे पंचांग हे अधिक गणितीय व सर्व काहि संशोधनाने सिधद झालेले व लॉजिकशीच संबंध असलेले आहे.

फक्त मनापासुन अभ्यास, संशोधन, पाठपुरावा किंवा कमीतकमी जिज्ञासु वृत्तीनं समजून घेतले पाहिजे.

अभय सावंत

Leave a Reply