योगी मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत? – संजय राऊत

मुंबई : ५ जानेवारी – आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित करत टीका केली तर दुसरीकडे त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील टोला लगावला आहे. योगी मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत? आमच्याकडे उद्योग ओरबडून नेणार असाल तर आमचा या रोड शोवर आक्षेप आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो करण्याची गरज काय? तिकडे दाओसमध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना जोरदर टोला लगावला आहे. योगी मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत? आमच्याकडे उद्योग ओरबडून नेणार असाल तर आमचा या रोड शोवर आक्षेप आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो करण्याची गरज काय? तिकडे दाओसमध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. त्यांची कसली आली रणनिती खोके, पेट्यावाल्यांना काय माहिती रणनिती काय असते ते अशा शद्बात राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
दरम्यान एकीकडे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांविरोधात भाजपाकडून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे याच व्हिडीओवरून संजय राऊत यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. बावनकुळेंच्या पोटात होतं ते ओठावर आलं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply