नागपूरच्या विद्यापीठाने शोधून काढली एड्सवरील लस

नागपूर : ५ जानेवारी – एचआयव्ही हा असा आजार आहे ज्यावर अजुनही अधिकृत औषध आलेले नाही. त्यामुळे भारतासह जगभरात एड्सवरील औषध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल सेंटर आणि प्रायोगिक न्युरोसायन्स विद्यापिठानी एड्सवरील लस शोधून काढली आहे.
ही लस उंदरावर यशस्वी झाली असून याची चाचणी आता माणसांवरही होणार आहे. या संदर्भात नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल सेंटर आणि प्रायोगिक न्युरोसायन्स विद्यापिठाचे वैज्ञानिक डॉ. सांथी गोरंटनी याबाबत माहिती दिली.
दरवर्षी देशभरात दहा लाख सत्तर हजार एड्सचे रुग्ण निघतात. सुरवातीला जेव्हा लस नव्हती तेव्हा अनेक लोक एड्सचे बळी पडायचे पण आता एड्सच्या लसीमुळे एड्स पसरण्यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. शिवाय या लसीमुळे रुग्ण बराच काळ जीवंत राह शकतात. मात्र लस बंद केल्यावर एड्स पुन्हा होण्याची शक्यता असते.
अशात नागपूरच्या नेब्रास्का मेडीकल सेंटर आणि प्रायोगिक न्युरोसायन्स विद्यापिठानी शोधून काढलेली ही लस माणसावर किती यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार.
मुळात उंदीर आणि माकडावर संशोधन करणे, खूप मोठे आव्हान असते. अनेक लसी प्राण्यांवर यशस्वी होतात पण माणसावर होत नाही. त्यामुळे ही लसही माणसावर यशस्वी होणार का? हे पाहावं लागेल.

Leave a Reply