खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा विमानातील विमानातील प्रवाशांशी जागेवरुन वाद

नवी दिल्ली : ५ जानेवारी – भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या विमानातल्या प्रवाशांशी जागेवरुन वाद घालताना दिसत आहेत.
भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ २०१९चा आहे. स्पाईसजेट कंपनीच्या विमानामध्ये प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी प्रवाशांशी जागेवरून वाद घातला होता. यामध्ये त्या फर्स्ट क्लास माझा हक्क असल्याचंही ओरडून सांगताना दिसत आहेत.
या व्हिडीओत प्रज्ञा ठाकूर ज्या जागेवर बसल्यात, त्या जागेवरुन हा वाद निर्माण झाला असल्याचं दिसत आहे. या वादामध्ये त्या प्रवाशांनी विमानाच्या कर्मचाऱ्यांनीही घेतलं आहे. तसंच तुम्ही लोकांच्या प्रतिनिधी आहात, तुम्ही लोकांना त्रास होईल असं वागता कामा नये, असं या प्रवाशांनी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना सुनावलं आहे.

Leave a Reply