मुंबई महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंची युती

मुंबई : ३ जानेवारी – ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पुढे आघाडीची चर्चा होत नसल्याची माहिती आहे.
परंतु येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेमध्ये महानगर पालिका निवडणुका एकत्र लढवायचं ठरलं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत नेण्याबाबत शिवसेना प्रयत्न करीत आहे. मात्र राष्ट्रवादीला वंचितला सोबत घ्यायला विरोध असून काँग्रेसचाही छुपा विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
त्यांनी पुढे म्हणाले की, गरीब मराठा सत्तेत यावा असं राष्ट्रवादीला वाटत नसावं म्हणून त्यांचा विरोध दिसतोय.असं असलं तरी आमचा आणि शिवसेनेचा निर्णय झाला, तो फक्त आम्हाला जाहीर करायचा आहे, असं स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिली.

Leave a Reply