मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदाराने कार्यक्रमात भर स्टेजवर केला हवेत गोळीबार

भोपळा : ३ जानेवारी – मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार सुनील सराफ हवेत गोळीबार केल्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनुप्पूर जिल्ह्यात नववर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुनील सराफ यांनी भर स्टेजवरुन गोळीबार केला. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायल व्हिडीओत सुनील सराफ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. नाचत असतानाच ते पिस्तूल बाहेर काढतात आणि हवेत गोळीबार करतात. भोपाळपासून ५७० किमी अंतरावर असणाऱ्या कोतमा शहरात हा प्रकार घडला आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कोतमा पोलीस स्टेशनने दिली आहे. जर थोडीशी चूक झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान आमदाराने मात्र ही फटाक्यांची बंदूक होती असा दावा केला आहे.

Leave a Reply