जलयुक्त शिवार योजनेत पैसै खालेल्या अधिकाऱ्यांवर महसुल विभागाची कारवाई

बीड : ३ जानेवारी – बीडच्या परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारातील आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदाऱ्यांवर महसुल विभागाने मोठी कारवाई केली आहे.
आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी वसुलीची 4कोटी रुपयांची रक्कम अद्यापपर्यंत पूर्णतः भरली नाही. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकरणातील सर्व आरोपींना रक्कम भरण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. ही रक्कम भरली नाही तर संबंधित अधिकारी-कंत्राटदारांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामूळे अधिकारी आणि गुत्तेदारांची धाबे दणाणले आहेत.
2016-17 या वर्षात परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजना आरोप करण्यात आला होता यात जलयुक्त शिवार प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण 24 अधिकारी, कर्मचारी व 129 कंत्राटदारांना 4 कोटी 83 हजार 347 रुपये भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र, चार वर्षांच्या कालावधीत 4 कंत्राटदारांनी केवळ 1 लाख 347 तर 16 अधिकाऱ्यांनी 40 लाख 17 हजार रुपये भरले आहेत. मोठ्या रकमा भरण्याची गती कमी असल्याने त्यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

Leave a Reply