छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर ते स्वराज्यरक्षकच – अमोल कोल्हे

मुंबई : ३ जानेवारी – अलीकडील अनेक इतिहासकारांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हंटलं. परंतु, त्याचवेळी दुसरीकडे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना ज्यावेळी कैद करण्यात आले त्यावेळच्या शेवटच्या काळ अलिकडील इतिहासकारांनी ग्राह्य धरला आणि त्यांना धर्मवीर ठवलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते, अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते असे म्हटले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यभरात अजित पवार यांच्याविरोधात आंदोलने देखील केली. याच पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्या व्हिडीओतून त्यांनी अनेक गोष्टींबाबत स्पष्ट सांगितले आहे.
“चिटणीसांच्या बखरीत अनेक गोष्टी रंगवण्यात आल्या आहे. परंतु, संभाजी महाराजांना जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या कटकऱ्यांना त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. त्यामध्ये मल्हार रामराव चिटणीसांचा पणजोबा म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस आणि आजोबा बाळाजी यांना देखील हत्तीच्या पायी देले होते. त्यामुळे हा राग मल्हारराव चिटणीसांच्या बखरीत आला असावा. त्यानंतर अनेक इतिहासकारांनी त्याच बकरीचा संदर्भ घेतला आणि मग संभाजीराजे हे धर्मवीर होते अशी कवी कल्पना समोर आली, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
इतिहासाकडे केवळ अभिनिवेशातून पाहण्यापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीने पाहणं गरजेचं आहे. इतिहासातून काय प्रेरणा मिळतात ते पाहणं फार गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ‘बुधभूषणम’ ग्रंथातून संभाजी महाराजांनी धर्माची फार चिकित्सा केलेली आहे. त्यावर त्यांनी काही श्लोक रचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फार महत्वाचा दंडक घालून दिला होता. तो म्हणजे माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. लोकल्याण हे स्वराज्याचं धेय होतं. त्यावेळी धर्मांतर झालेल्या अनेक लोकांना शिवाजी महाराज यांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं होतं. संभाजी महाराजांनी देखील तोच कित्ता गिरवत छत्रपती पद धारण केल्यानंतर त्यांनी जबरदस्थीने धर्मांतर घडवण्यावर बंदी आणली होती, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी या व्हिडीओतून दिली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी इतिहासाचे अनेक दाखले देखील दिले आहेत.
अमोल कोल्हे म्हणाले, “अनेकांचं म्हणणं आहे की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं म्हणून त्यांना धर्मवीर ही उपाधी लागली. परंतु, या गोष्टीचा आपण चिकित्सक पद्धतीने विचार केला तर तत्कालीन पुराव्यानुसार औरंजेब बादशाहाने शंभुराजांना दग्याने कैद केल्यानंतर त्यांना दोन प्रश्न विचारले की स्वराज्यातील खजिना कोठे आहे आणि आमच्याकडचे तुम्हाला कोण कोण सामील आहेत? खाफी खान, इश्वरदास नागर, भिमसेन सक्सेना आणि साकी मुस्तेद खान चारही इतिहासकारांनी याबाबत लिहून ठेवलं आहे. त्यामुळं जबरदस्तीने संभाजीराजांनी धर्मांतर करण्यास नकार दिला याला कोणताही आधार नाही. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब बादशाह आणि संभाजीराजे यांच्यातील धर्मयुद्ध नव्हते. कारण औरंगजेब याने आदिलशाही नेस्तनाबूत केली, कुतुबशाहीन नेस्तनाबूत केली, स्वत:च्या वडिलांना हाल-हाल करून मारलं, स्वत:च्या भावांची कत्तल केली. त्यामुळे ते धर्मयुद्ध नसून ते सत्ता वर्चस्वाची लढाई होती. त्याच औरंगजेबाला संभाजी महाराजांनी नऊ वर्षे फरफटवलं होतं. त्यामुळं हे धर्मयुद्ध होत नाही.

Leave a Reply