शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सुरु

वाराणसी : २ जानेवारी – ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा सर्व्हे भारतीय पुरातत्व विभाग च्या टीमकरुन करण्यात येणार आहे. आजपासूनच शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. कारण २० जानेवारीपर्यंत पुरातत्व विभागाला अहवाल तयार करायचा आहे.
न्यायमूर्ती सोनिका वर्मा यांनी सर्वे करण्याचे आदेश दिले होते. हिंदू पक्षकारांच्या म्हणण्यानुसार आता मशिद ज्या ठिकाणी उभी आहे तिथे पूर्वी भगवान श्रीकृष्ण यांचं जन्मस्थान आहे. मशीदीची १३.३७ एकर जमीनीवरील मालकी हक्कासंबंधी हा वाद आहे. हिंदू पक्षकारांनी ईदगाह मशीद तिथून हटवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर, शाही इदगाह मशीदीचे वकील तनवीर अहमद यांनी याविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.
१७व्या शतकात औरंगजेबच्या आदेशानुसार श्रीकृष्ण जन्मभूमीच्या बाजूला असलेले मंदिर तोडून ईदगाह मशीद बांधण्यात आली होती, असा दावा केला जातो. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी संकुलाची १३.३७ एकर जागा आहे. तेथेच केशव देव मंदिराच्या जागेवर ही मशीद उभारण्यात आल्याचा दावा करीत ही मशीद हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
शाही इदगाह मशीद १६७० मध्ये औरंगजेबाने बांधली होती. मशीद बांधण्याआधी त्या जागी एक प्राचीन मंदिर होते. १८१५मध्ये वारणसीचे राजा पटनी मल यांनी १३.३७ एकर जमीन ईस्ट इंडिया कंपनीने एक लिलावात खरेदी केली होती. त्याच जमिनीवर इदगाह मशीद आणि श्रीकृष्ण मंदिर आहे.
राजा पटनी मल यांनी ही जमिन जुगल किशोर बिडला यांना विकली होती. यानंतर पंडित मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भीकेन लालजी आत्रेय यांच्यानाववर जमिनीची नोंदणी झाली. किशोर यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर केली.

Leave a Reply