भारतीय नागरिक भाग्यवान, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान मोदी करत आहेत – जे. पी. नड्डा

चंद्रपूर : २ जानेवारी – संपूर्ण जग संकटाच्या काळात असताना, प्रत्येक देशावर आघात होत असताना भारतीय नागरिकांनी स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे. मोदीजींच्या याच धोरणांमुळे जग आज भारताकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले. ते सोमवारी चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आखलेल्या भाजपच्या मिशन १४४ आणि मिशन २५ या मोहिमांचा जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याप्रसंगी जे.पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या भारताच्या विकासाचा पाढा वाचला.
ज्या ब्रिटनने आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, मंदीच्या काळात त्याच ब्रिटनला मागे टाकून भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. सद्यस्थितीत अमेरिका, रशिया हे देश महागाईचा सामना करत आहेत. मात्र, भारत महागाई आटोक्यात आणून अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया रचत आहे. आजघडीला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश झाला आहे. २०१४ पर्यंत भारतामध्ये ५२ टक्के मोबाईल फोन बाहेर यायचे. मात्र, आज ९७ टक्के मोबाईल फोनची निर्मिती देशात होत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था कोलमडत असताना मोदीजींमुळे आपली अर्थव्यवस्था मजबूतपणे पुढे वाटचाल करत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
अमेरिकेत अजूनही लसीकरण पूर्ण झालेले नाही. मात्र, भारतात २२० कोटी लसीचे डोस दिले गेले. काँग्रेसचे नेते अशिक्षित आहेत. त्यांच्यामुळे देशात टीबी आणि पोलिओसारख्या आजारांच्या लसी येण्यासाठी अनेक वर्षे गेली. मात्र, कोरोनाची साथ पसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स स्थापन करून अवघ्या ९ महिन्यात कोरोनाच्या दोन लसी आणल्या. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील अतिगरिबी एका टक्क्यापेक्षाही कमी झाली. गरीब कल्याण योजनेतंर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मोफत धान्यामुळे हे शक्य झाले. या सगळ्यामुळे भारताकडे जगातील इतर देश वेगळ्यादृष्टीने पाहू लागले आहेत, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले.
‘हिंदू ह्रदयसम्राटांचे बेटे उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये साधुवर हल्ला झाल्यावर सीबीआय ला तपास करण्यास नकार दिला. तीन पक्षाचे सरकार असताना उद्धव ठाकरे आधी काँग्रेसला माथा टेकवत होता, आता अखेर पूर्णच झुकले आहे’, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टिका केली.
भाजपने मिशन 144’ ची घोषणा केली आहे. या मिशनची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पासून चंद्रपुरातून केली. यावेळी जे.पी. नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारला मागे टाकत काँग्रेस सोबत आघाडी केली. मोदी स्टेजवर असताना केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्रचे नारे लागत असताना शांत होते. मात्र निकाल समोर येताच मनात लाडू फुटले आणि विचार धारेला मागे टाकलं. ज्यांनी भारताच्या संस्कृतीला समजण्यास नकार दिला त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवलं, अशी टीका नड्डांनी ठाकरेंवर केली.
‘हिंदूह्रदयसम्राटांचे बेटे उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये साधुवर हल्ला झाल्यावर सीबीआय ला तपास करण्यास नकार दिला. तीन पक्षाची सरकार असताना उद्धव ठाकरे आधी काँग्रेसला माथा टेकवत मग काँग्रेसला माथा टेकवत आणि अखेर पूर्णच झुकले आहे, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टीका केली.
‘महाविकास आघाडी सरकारमध्ये दलाली आणि कमिशन खोरी केली महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी युती सरकारला संधी द्या. भाजप आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. भाजपच्या विजयाची सुरुवात चंद्रपूर पासून होईल’, असं आश्वासनही नड्डांनी दिलं.

Leave a Reply