पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने ४ वर्षीय चिमुकला जखमी

अकोला : २ जानेवारी – मकरसंक्रांत आली की पतंग उडवणाऱ्यांची मोठी गर्दी होते. अकोल्यात पतंगाचा मांजा एका चिमुकल्याच्या जीवावर बेतता बेतता राहिल्याची घटना घडली. पतंगाचा मांजा गळ्याभोवती अडकल्याने एक चार वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. वीर प्रकाश उजाडे असं या चिमुकल्याचं नाव आहे. या अपघातात त्याच्या श्वसननलिकेला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर श्स्त्रक्रिया केल्यानंतर त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या मानेला दहा टाके लागले आहेत. आईसोबत दुचाकीवर बाजारात जाताना ही दुर्घटना घडली. चायनीज मांजावर बंदी असताना राज्यभरात सर्रासपणे हा मांजा विकला जातोय.

Leave a Reply