समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी? -एमएसआरडीसी आणि परिवहन खात्याने केले निरीक्षण

नागपूर : ३० डिसेंबर – समृध्दी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या बघता शासनाच्या एमएसआरडीसी आणि परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूरहून 87 किलोमीटर मार्गाचे निरीक्षण केले. समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबरला लोकार्पण झाले. या 19 दिवसांत किरकोळ व प्राणांतिक अपघाताने शंभरी गाठली आहे. 28 डिसेंबर रोजी एका कार अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर वडील आणि मुलगी गंभीर जखमी झाले. याची गंभीर दखल घेऊन एमएसआरडीसी ने आरटीओ सोबत हा दौरा केला. समृद्धी महामार्गावर होणाया अपघातासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार याच्या अध्यक्षतेखाली आज बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महामार्गावर झालेला अपघातांची माहिती या महामार्गावर वाहतुकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षनियरीत्या कमी करणे इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा केली गेली
नागपूर ते शिर्डी महामार्गावर येणाया सर्व जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना या बैठकीसाठी उपस्थित होते.
त्यात नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, अमरावती,औरंगाबाद, वर्धा, बुलढाणा, वाशिम, जालना आणि श्रीरामपूर यांचा समावेश आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघात टाळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष सूचना दिल्या आहे, तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र थांबेना अशी स्थिती आहे. वाशिममध्ये कारंजाजवळ झालेल्या कार अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलावून स्पीड ब्रेकर, स्पीड मॉनिटरिंग सिस्टम आणि इतर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले असून तात्काळ अंमलबाजवणी करण्याच्या सूचना दिल्या आहे.

Leave a Reply