शिर्डीजवळ साई पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांवर गोळीबार

शिर्डी : ३० डिसेंबर – शिर्डीजवळ साई पालखी घेऊन येणाऱ्यांवर गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असल्याची माहिती समजते. अज्ञाताकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिर्डीजवळ सावळीविहीर इथं अज्ञात तरुणाने गोळीबार केला. साई पालखी घेऊन येणाऱ्यांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. जखमीला शिर्डीतील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
गोळीबाराचे कारण वैयक्तिक किंवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. साई पालखी ही मुंबईतील गोरेगाव इथून शिर्डीला आली होती. गोळीबारात जखमी झालेल्यावर शिर्डीत साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply