वैद्यकीय महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना कॅम्पसमधील जेवणाने झाली विषबाधा

नाशिक : ३० डिसेंबर – नाशिकमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त कॅम्पसमध्ये विषारी अन्न सेवन केल्याने १०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यातील सुमारे ५५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इगतपुरी तालुक्यातील धरमगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमधील विद्यार्थ्यांनी बुधवारी मळमळ आणि पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कँटीनमध्ये जेवण केलं होतं.
“संस्थेच्या कॅन्टीनमध्ये जेवल्यानंतर सुमारे 100-125 विद्यार्थी आजारी पडले, त्यानंतर त्यांना कॅम्पसमधील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी बहुतेकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुमारे 50-55 विद्यार्थी अजूनही रुग्णालयात दाखल आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कँटीन एका खासगी कंपनीद्वारे चालविली जाते.

Leave a Reply