विदर्भात केवळ ७ टक्के उद्योग – अंबादास दानवे

नागपूर : ३० डिसेंबर – राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विदर्भासाठी ४१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. मात्र, विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भातील उद्योग बाहेर गेले.
राज्यात ३६ हजारांपेक्षा अधिक उद्योग असताना विदर्भात केवळ अडीच हजार अर्थात ७ टक्के उद्योग आहेत, अशी माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. निमित्त होते विदर्भाचा अनुशेष या विषयावर २६० अन्वये सुरू असलेल्या चर्चेचे.
यावेळी दानवे म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केले, असा सवाल वारंवार विचारला जातो. अडीच वर्षे कोरोनाची साथ होती. परंतु त्यापूर्वीची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, हे विसरता येणार नाही.
फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विदर्भासाठी ४१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. मात्र, या पॅकेजची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासणे आवश्यक आहे. अनुशेषावर फक्त बोलले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले

Leave a Reply