बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले झोपडी आंदोलन

नागपूर : ३० डिसेंबर – पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अखेर तिसऱ्या दिवशी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री अकराच्या सुमारास आंदोलनस्थळी गेले. त्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले.
मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी नंतर स्वत: झोपडीत जाऊन पाहणी केली. झोपडीत पालाच्या घरात राहणे साधी सोपी गोष्ट नाही. यासंदर्भात तातळीने बैठक लावू. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. तुमची मागणी मोठी नाही. तुम्हाला राहायला घर पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण व शहरी भागात जी तफावत आहे ती एकसमान करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रु या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply