शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने सिबिल विचारु नये – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २९ डिसेंबर – विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना छळणाऱ्या बँकांना इशारा दिला आहे.
परवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले होते. त्याला आज फडणवीसांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘ दादांनी अनेक विषयावर चर्चा केली होती. एका गोष्टीचं दुख: आहे की संधी मिळाली असताना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. 2004 ला संधी होती.
तुमचे जास्त नेते निवडून आले होते. तुमच्या काराराप्रमाणे ज्याचे जास्त नेते त्याचा मुख्यमंत्री झाला असता तरीही तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली नाही, असा टोला अजित पवार यांना फडणवीस यांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांविषयी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने सिबिल विचारु नये, मग ती बँक खाजगी असो की राष्ट्रीयकृत. सिबिलचा मुद्दा कोणी उपस्थित केला आणि तक्रार आली तर नक्की कारवाई करु, असं ते म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, विदर्भातल्या बँका बंद पडल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला असला तरी त्या तीन बँका त्यांच्याच हातात होत्या. विरोधकांचं सरकार असतांना विदर्भातील बँका कमजोर करण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही त्या बँका पुरुर्जीवित करण्यासाठी ५०० कोटी दिले परंतु बँकांची अर्थस्थिती सुधारली नाही.

Leave a Reply