तीन चिमुकल्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

नागपूर : २९ डिसेंबर – कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, पाच आणि नऊ वर्षांच्या चिमुकल्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली.रामपाल नडिया (वय ४०, रा. कोराडी) असे आरोपीचे नाव आहे. तो या तिन्ही मुलांचा नात्यात आजोबा लागतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कोराडी भागात एक कुटुंब राहते.
दोघेही पती-पत्नी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या नात्यात आरोपी रामपाल आहे. तो काही दिवसांपूर्वी राजस्थान येथून नागपूरला आला. तसेच त्यांच्या घरी राहू लागला. रामपालला दारू पिण्याची सवय आहे. मंगळवारी त्याने त्याच्या नात्यातील ८ वर्ष वयाची मुलगी, ५ वर्ष वयाचा मुलगा तसेच व परिसरात असलेल्या त्यांच्या नातेवईकाची ९ वर्षाची मुलगी या सर्वांना चॉकलेटचे आमिष दाखविले. रामपाल ओळखीचा असल्याने तिघेही त्याच्यासोबत निघाले. यानंतर घरच्यांनी मुलांचा शोध घेतला.
दरम्यान शेजारच्यांनी रामपालसोबत ते दिसल्याची माहिती दिली. लगेच कोराडी पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान रामपाल त्यांना रेल्वेत बसवून घेऊन गेल्याची माहिती समोर आली. यावरून कोराडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांना सूचना दिली. त्यांच्या मदतीने मध्यप्रदेशातील आमला स्टेशनवर रामपालला अटक करण्यात आली. दरम्यान आरोपीला कोराडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याची चौकशी सुरू आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवि एस. नागोसे, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक फौजदार दिलीप कुसराम, पोलिस हवालदार विश्वास सोमकुवर, कृष्णा रोकडे, अंमलदार संजय वानखडे, राहुल कनोजिया, नरेश उके, ममता यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply