सर्वच अधिकाऱ्यांचे निलंबन योग्य नाही – अजित पवार

नागपूर : २८ डिसेंबर – विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवसाचे कामकाजाला सुरुवात होत असून तत्पूर्वी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सर्वच अधिकाऱ्यांचे निलबंन योग्य नसल्याचे म्हटले.
अधिवेशनाच्या काळात आतापर्यंत १० ते १२ अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. पण यातील सर्वच अधिकारी दोषी नाही. त्यांची माहिती मी घेतली आहे. मी लोकशाहीची आयुधे वापरून हा प्रश्न उपस्थित करू. यात कुठलेही राजकारण नाही. अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी आमदार करतात. पण सर्वच अधिकारी दोषी नसतात, असे अजित पवार म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचे प्रकरण पुढे आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की आमदार, मंत्री व्हायला संविधानाने, कायद्यातील नियमात जे सांगितले असते, ते बघायचे असते. बाकी डिग्री बोगस आहे की नाही, हे गौण असते. तसे उदय सावंत हे हुशार आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था आहे. त्यांनी विद्यापीठ काढले आहे. त्यांच्यावर टिकाटिप्पणी करण्यावर माझा अधिकार नाही. १०- १० डिग्र्या असलेले कसे काम करतात आणि कमी शिकूनअसलेलेही कसे काम करतात. हे महत्वाचे असते. यावेळी त्यांनी चवथा वर्ग शिकलेले वसंतदादा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या प्रभावी कामाचे उदाहरण यावेळी दिले.

Leave a Reply