मुंबईवर दावा करणं खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २८ डिसेंबर – नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र , कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मंगळवारी सभागृहात कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद कर्नाटकच्या विधिमंडळात देखील उमटल्याचे दिसून आले. मुंबईमध्ये वीस टक्के कानडी लोक आहेत, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करा असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकाचे उच्च शिक्षणमंत्री सी.एन. अश्वथ्य नारायण यांनी केलं. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलचं तापलं असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना कर्नाटकच्या मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा करणं खपवून घेणार नाही अशा शद्बात फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला खडसावले आहे.
मंगळवारी कर्नाटकच्या मंत्र्याकडून मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करण्यात आली होती. या वादग्रस्त व्यक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर दावा करणं खपवून घेणार नाही. बोलघेवड्या मंत्र्यांना तंबी देण्यात यावी अशा शद्बात फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला सुनावले आहे. तसेच कर्नाटकच्या संबंधित मंत्र्याची तक्रार करणार अल्याचं देखील यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.
मुंबईमध्ये वीस टक्के कानडी लोक आहेत, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करा असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकाचे उच्च शिक्षणमंत्री सी.एन. अश्वथ्य नारायण यांनी केलं. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलचं तापलं आहे. फडणवीस यांनी थेट कर्नाटक सरकारला इशाराच दिला आहे. तर दुसरीकडे विरोधक देखील या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.

Leave a Reply