सध्याचे सरकार हे चोरांचे सरकार, हे सरकार बदलायला हवे – प्रकाश आंबेडकर

नागपूर : २७ डिसेंबर – ”महाराष्ट्र सरकार लोकांच्या प्रश्नात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील गुंत्यामध्ये अडकले आहे”, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज विधानभवनावर मोर्चा काढला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”सध्याचं सरकार हे चोरांचं सरकार. हे सरकार बदलायला हवं.”
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ”अतिक्रमणबद्दल न्यायालयीन लढाईत सरकार न्यायालयात बाजू मांडायला गेलं नाही. म्हणून न्यायालयाने अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवायला सांगितले. महाराष्ट्र सरकारला याबद्दल निवेदन देऊन विनंती केली. सरकारने आश्वासन दिली. मात्र काही ही करत नाही.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री आपण रिक्षाचालक असल्याचे सांगताना. आपली सुरुवात ही सामान्य नागरिक म्हणून झाली आहे. ते म्हणाले, आज सर्वच सुलतान उभे झाले आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते मागासवर्गीयांचे अतिक्रमण सोडून इतर काढा. उच्च न्यायालय म्हणते सर्व अतिक्रमण काढा. मग ऐकायचे कोणाचे, छोटे साहेबांचे की मोठे साहेबांचे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत ते म्हणाले की, ”विदर्भवादी म्हणतात विदर्भ घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर पश्चिम महाराष्ट्रातले नेते म्हणतात आम्ही सोडणार नाही. कारण विदर्भामुळेच राज्याचे वन क्षेत्र प्रमाण टिकून आहे.. विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्रातील अर्धे उसाचे मळे वन क्षेत्रात आणावे लागतील. मग नेत्यांच्या कारखानदारीची अडचण होईल.”
आरएसएसवर हल्लाबोल करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ”आरएसएसचा एजेंडा आहे, ना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात सहभाग घेतला आहे. ना ते सामाजिक लढ्यात सहभागी झाले आहे. त्यामुळे ते लोकांच्या डोक्यात जे महापुरुष आहे ते पुसून टाकण्याचा डाव आहे.” मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील मला तुमचा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करायचे आहे. 5 लाख लोक येतील. दादा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. मी म्हणतो चंद्रकांत पाटील खरे म्हणाले. त्यांनी कबुली दिली की भाऊराव पाटील आणि बाबासाहेबांच्या संस्था लोकवर्गणीतून उभ्या झाल्या. मात्र हे म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी हे कबूल केले की आरएसएसच्या सर्व संस्था खोका संस्कृतीतून निर्माण झाल्या आहे.

Leave a Reply