मुलीच्या कायमस्वरूपी नियुक्तीवरून अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत

मुंबई : २७ डिसेंबर – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. आता सत्तार यांच्या मुलीच्या कायमस्वरुपी नेमणुकीवरुन नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
याबद्दल माहिती अधिकारातून माहिती समोर आली आहे. बारामतीचे कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे.
शिक्षक भरतीवर राज्य शासनाने रितसर २ मे २०१२ पासून बंदी घातलेली असताना देखील विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या श्रीमती शेख हिना कौसर अब्दुल सत्तार या मुलीची १६ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षण सेवक म्हणून कायम नेमणूक केली.
तर ही नेमणूक करत असताना शिक्षण सेवक म्हणून कायम (परमनंट) करण्यासाठी जे टिईटी प्रमाणपत्र बंधनकारक असते ते टिईटी प्रमाणपत्रच शासनाकडे उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. म्हणजेच टिईटी प्रमाणपत्राविना अब्दुल सत्तार यांच्या मुलीची कायम नेमणूक झाली आहे.
तसंच त्यांनी शासनास सादर केलेल्या आधार कार्ड, पॅनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्नतारखांचा वेगवेगळा उल्लेख आढळुन येत आहे. तर दुसऱ्या मुलीची माहितीच त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. यामुळे आता अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply