टेकडी गणेश मंदिराला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू – डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : २७ डिसेंबर – नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेले टेकडी गणेश मंदिराला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी उपविभागीय अधिकारी शहर शेखर घाडगे यांना कॉल करून याबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली असून लवकरच उचित कार्यवाही करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.
गणेश मंदिराला लगतच्या संरक्षण विभागाची जागा मिळावी याकरिता मंदिर समितीचे अनेक दिवसापासून मागणी प्रलंबित आहे. या संबंधात मंदिराचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी आज उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना विधानभवन येथे निवेदन देऊन मंदिरासाठी अतिरिक्त जागा मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply