कोणतेही युद्ध झाले तर, एकाशी नाही तर दोघांशी होणार – राहुल गांधी

नवी दिल्ली : २६ डिसेंबर – अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीन आणि पाकिस्तान सीमाप्रश्नावरून मोठं विधान केलं आहे. चीन आणि पाकिस्तान एकत्र आहे. आता युद्ध झालं तर दोघांविरुद्ध होईल, असे राहुल गांधींनी सांगितलं आहे.
राहुल गांधींनी भारताच्या माजी सैनिकांशी संवाद साधला आहे. तेव्हा बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये गलवान आणि डोकलाममध्ये झालेल्या चकमकींचा एकमेकांशी संबंध आहे. पाकिस्तानला हाताशी धरून भारताला नुकसान पोहवण्याची चीनची रणनिती आहे. पाकिस्तान आणि चीनमध्ये आर्थिक संबंध आहेत.”
“पाकिस्तान आणि चीन एकत्र आले आहेत. कोणतेही युद्ध झाले तर, एकाशी नाहीतर दोघांशी होणार आहे. युद्ध झाले तर भारताला मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावं लागेल. कारण, भारताची आताची स्थिती कमजोर आहे. भारतात अशांती, गोंधळ, द्वेष आहे. भारताची मानसिकता संयुक्त कारवाई अथवा सायबर युद्धाची नाही. भारत खूप कमकुवत आणि कमजोर आहे. चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात भूमिका घेऊन चकित करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सरकार गप्प बसू शकत नाही,” असं राहुल गांधी म्हणाले
“सीमाभागात काय चालू आहे, हे सरकारनं सांगितलं पाहिजे. सरकारने आतापासून सीमाप्रश्नाबाबत पाऊले उचलण्याची गरज आहे. भारताला पाच वर्षापूर्वीच कारवाई करायला पाहिजे होती, जी केली नाही. याबाबत लवकर कारवाई नाही केली तर, भारताला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे,” असेही राहुल गांधींनी सांगितलं आहे.

Leave a Reply