केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : २६ डिसेंबर – बजेटअवघ्या एका महिन्यावर आलं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण देशालाअर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेटमध्ये कोणत्या गोष्टी मांडणार याची प्रतिक्षा असताना ही बातमी समोर आली आहे.
वृत्तानुसार, 63 वर्षीय सीतारमण यांना दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयातील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ तोंडावर असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी 2023 चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी एम्स दिल्ली येथे दाखल करण्यात आले आहे.
अर्थमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना रूटीन चेकअप साठी रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. “गंभीर किंवा घाबरण्यासारखे काहीही नाही. असं रॉयटर्सने त्याच्या जवळच्या एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply