एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा

गोंदिया : २४ डिसेंबर – गोंदिया येथील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत झिलमिली गावाजवळ खाजगी क्लासला जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीची भर दिवसा खून करण्यात आला होता. दरम्यान हा खून एकतर्फी प्रेमातून हातोडयाने डोक्यावर वार करत तसेच ब्लेडने गळ्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी 21 वर्षीय आरोपीला न्यायालयाने आजीवन (मरेपर्यंत) सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अशी गोंदिया जिल्ह्यातील पहिली घटना असून न्यायालयाने 10 महिन्यातच निकाल लावत शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी 2022 ला सायंकाळी 4 च्या दरम्यान पिडीता ही झिलमिली मार्गाने ग्राम कामठा येथील खासगी क्लासला जात होती. यावेळी आरोपी दुर्गाप्रसाद रहांगडालेने पिडितेला रस्त्यात अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्याशी लग्नकर अशी मागणी केली. मात्र पिडीतेने नकार दिल्याने आरोपीने तिच्या डोक्यात हातोडयाने वारा केले व गळयावर ब्लेडने वार करून तिला जागीच ठार केले.
एवढेच नव्हेतर स्वत:वर सुद्धा ब्लेडने वार करून संपवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रसंगी शेतात मोटारपंप दुरूस्त करीत असलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३०२, ३०९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.
पोलिसांनी आरोपी कडून हत्यारे जप्त करत न्यायालयात सर्व पुरावे दाखल केले होते. न्यालयातील सरकार पक्षाकडून विशेष तथा अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी आरोपी विरुद्ध पुरावे व 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे.
याबाबत सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.बी. लवटे साक्षीदारांचे पुरावे, न्यायवैद्यक पुरावे व प्रत्यक्ष पाहणी साक्षीदारांची साक्ष पुरावे ग्राह्य धरून आरोपीस आजीवन (मरेपर्यंत) सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply