नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर आणला शरीरसंबंधांचा दबाव

कोटा : २३ डिसेंबर – राजस्थानमधील कोटा इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय, त्यामुळे तिथलं वातावरण चांगलंच तापलंय. राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये (आरटीयू) नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी प्रोफेसर गिरीश परमारला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक विद्यार्थी अर्पित अग्रवाल यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहते. आरोपी प्रोफेसर गिरीश परमार याने पीडितेचा क्लासमेट अर्पित अग्रवाल याच्यामार्फत तिला शारीरिक संबंधांच्या बदल्यात परीक्षेत पास करण्याची ऑफर दिली होती. पीडितेने यासाठी नकार दिल्यावर त्याने तिला अंतिम वर्षाच्या परीक्षेत नापास केलं आणि नंतर त्याची ऑफर स्वीकारण्यासाठी तिच्यावर अनेक वेळा दबाव टाकला. प्रोफेसरने इतर विद्यार्थिनींशीही असंच वर्तन केलं, ब्लॅकमेल करून त्यांचा छळ केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

Leave a Reply