खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधानांकडे केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तक्रार

नवी दिल्ली : २३ डिसेंबर – सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करून सीमावादात तेल ओतत असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची खासदार धैर्यशील माने यांनी थेट पीएम मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धैर्यशील माने यांनी आज पंतप्रधानांची भेट घेत बोम्मई सातत्याने करत असलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत सगळा विषय त्यांच्या कानी घातला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह यांच्या शिष्टाईनंतर ही अशा पद्धतीची विधान होत असतील तर ते चुकीचं असल्याचे धैर्यशील माने यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयात उभयंतात भेट झाली.
धैर्यशील माने यांनी सीमाभागात जाताना माझ्यासह काही मंत्र्यांना अडवण्यात आलं, याचाही उल्लेख पत्रकात केला आहे. कर्नाटकात जाण्यासंदर्भात अधिवेशन संपलं की लवकरच आम्ही नवीन तारीख जाहीर करू, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.

Leave a Reply