काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची माझी इच्छा – संजय राऊत

नवी दिल्ली : २३ डिसेंबर – राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचेल, तेव्हा या यात्रेत सहभागी व्हावं, अशी माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राऊत हे सद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषेद घेत विविध मुद्द्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
भारत जोडो पुढच्या दोन दिवसात दिल्लीत दाखल होणार आहे. या यात्रेत सहभाही होण्यासाठी राहुल गांधींचे मला पत्र आले आहे. पण मी स्वत: असं ठरवलं होतं, की भारत जोडो यात्रा जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचेल, तेव्हा या यात्रेत सहभागी व्हावं. मात्र, दिल्लीतील यात्रेत सहभागी होण्याबाबत आम्ही विचार करू”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी शिंदे सरकारवरही टीकास्र सोडले. “काल विधानसभेत सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. गोंधळ झाला. अनावश्यक विषय चर्चेला आले. खोके सरकारचे आमदार ज्या पद्धतीने काल व्यक्तीगत विषयांवर बोलत होते, त्यांना कर्नाटकने मंजूर केलेल्या ठरावाबाबत माहिती नसावी? हे यांचे महाराष्ट्र प्रेम आहे. ज्यापद्धीने कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राला एक इचंही जमीन देणार नाही, असा ठराव मांडला. मुळात आम्हाला एक इंचही जमीन नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचे बेळगाव, कारवार आणि इतर गावं हवी आहेत. हा आमचा कायदेशीर दावा आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या विषयावर तोंड शिवून बसले आहे”, असे ते म्हणाले.
दरम्यान, मोहित कंबोज यांना मिळालेल्या क्लिनचीट बाबत विचारला असता, “शिंदे सरकारने क्लिनचीटचा कारखाना उघडला आहे. उद्या हे सरकार बोम्मईंनाही क्लिनचीट देईल. दाऊद इब्राहीम किंवा अबू सलेम यांनीही यांनीही भाजपात प्रवेश केला, तर त्यांनाही क्लिनचीट मिळेल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. “या राज्यात क्लिनचीट कोणालाही मिळू शकते आणि विरोधकांना गुन्हेगार ठरवले जाऊ शकते. त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. क्लिनचीटचा कारखाना आणि दिलासा घोटाळा या सुत्रीवरच हे सरकार चालते आहे”, असेही ते म्हणाले.

Leave a Reply