सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांची ‘AU कौन है’ असे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

नागपूर : २२ डिसेंबर – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकीय आखाडा तापला आहे. खासदार राहुल शेवाळेंनी लोकसभेत आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहण्यास मिळाले. शिंदे गटाच्या आमदारांनी ‘AU कौन है’ असे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज सकाळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड यांच्यासह अन्य आमदार हे ये ‘AU, AU कौन है’ असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या आमदारांनी श्रीखंडाचे डब्बे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. याच मुद्दावर संजय राऊत यांनी शेवाळे यांच्यावर सडकून टीका केली.
‘शेवाळे हा किरकोळ माणूस आहे, जो सदस्य सदनात नसतो त्याचं नाव घेता येत नाही. असा लोकसभेचा नियम आहे. हे ठरवून चाललं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप होत आहे, म्हणून अशी विधान करत आहे. अशा कितीही फाइल निघतील. तुमच्या घरातल्या सुद्धा फायली निघू शकतात. फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Leave a Reply