राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेला संरक्षण द्या – मनिषा कायंदे

नागपूर : २२ डिसेंबर – सत्ता पक्षाने सभागृहात एयुच्या घोषणा देऊन आदित्य ठाकरे यांच्या चरित्राचे हनन केले आहे. तर, दुसरीकडे खासदार शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. तिला भारताबाहेर जावं लागलं आहे. ती मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यास इच्छूक आहे. परंतु, तिला मुंबईत येऊ दिले जात नाहीये. त्यामुळे त्या पीडितेला मुंबईत येण्यासाठी संरक्षण द्यावे, या संदर्भातील पत्र शिवसेना उद्धठ ठाकरे सेनेच्या प्रवक्ता मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे त्यांनी सभागृहाबाहेर येऊन माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply