बोगस आदिवासी मुद्द्यावरून आ. डॉ. किरण लहामटे यांची विधानभवनात नारेबाजी

नागपूर : २१ डिसेंबर – बोगस आदिवासी कायम करून खऱ्या आदिवासींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असे फलक घेऊन अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विधानभवन परिसरात नारेबाजी केली. गळ्यात सरकारचा जाहीर निषेध असो अशा आशयाचे फलक गळ्यात लटकवून त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाप्रमाणे अधिसंख्य पदावरील बोगस कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून काढून टाकणे, त्यांना कोणतेही सेवाविषयक लाभ न देणे आणि असे आदेश असताना राज्य शासनाने शासनाने या बोगस आणि बेकायदेशीर कर्मचारी यांना संरक्षण देवून राज्यातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. खोटी जात प्रमाणपत्रे सादर करून अधिसंख्य पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खऱ्या आदिवासींचे हक्क बळकावले. आदिवासी समाजाचे नुकसान केले, याला सरकारचा पाठिंबा मिळतोय, या विरोधात आदिवासी संघटना एकवटल्या आहेत.

Leave a Reply