सभागृह तहकूब होताच युवा आमदारांचा झणझणीत ‘सावजी’वर ताव

नागपूर : २० डिसेंबर – विदर्भ म्हटले की आठवते येथील अस्सल सावजी जेवण. या सावजीचे भल्या भल्याना वेड. अनेक जण तर केवळ सावजी खायला नागपूर गाठतात. मग, अधिवेशनाला आलेले आमदार तरी किती काळ सावजीपासून अलिप्त राहू शकणार? अखेर त्यांनी मोका साधलाच. मंगळवारी सभागृह तहकूब झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या युवा आमदारांनी विधानभवन परिसरातील हॉटेलमध्ये विदर्भाच्या प्रसिद्ध सावजी जेवणावर मनसोक्त ताव मारला.
नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. या मुद्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

Leave a Reply