राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि. १९ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमीतेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यपाल २४ डिसेंबरपर्यंत नागपूर येथे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ११ व्या पदवीदान समारंभारला उपस्थित राहतील. दुपारी ४.३० वाजता राजभवन येथे आयोजित मोहजाल या पथनाट्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान या विषयावर जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्यासमवेत राजभवन नागपूर येथे आढावा बैठक ते घेणार आहेत. २३ डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांची बैठकीत ते सहभागी होतील. शनिवार २४ डिसेंबर सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमारेषेवरील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक. त्यानंतर दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित कुलगुरूंच्या संमेलनास ते उपस्थित राहतील.

Leave a Reply