नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच जंगी स्वागत

नागपूर : १९ डिसेंबर – कोरोनानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपूरमध्ये दाखल झाले. सोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील नागपुरात दाखल झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर नागपूरच्या शिवसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विमानतळ परिसर दणाणून सोडला.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, सचिनअहिर, दुष्यंत चतुर्वेदी, विलास पोतनीस, सुनील शिंदे, नरेंद्र दराडे उपस्थित होते.

Leave a Reply