क्रीडा स्पर्धेत आलेल्या अपयशामुळे धावपटूने केली आत्महत्या

नागपूर : १९ डिसेंबर – शालेय क्रीडा स्पर्धेतील अपयशामुळे नैराश्येतून धावपटूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. निखिल तराळे असं आत्महत्या केलेल्या मृत धावपटूचं नाव असून तो 16 वर्षांचा होता. त्यानं शेतातील कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. मानकापूर येथील क्रीडा संकुलनात जिल्हास्तरीय स्पर्धेत निखिलनं चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांची चंद्रपूरयेथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेकरता निवड झाली होती. मात्र चंद्रपूरातील विभागीय स्पर्धेत त्याला अपयश आल्यानं त्याचं मनोधैर्य खचलं होतं. त्याच नैराश्येतूनच त्यानं शेतात कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्रातील नागपुरातील विभागीय क्रीडा स्पर्धेत 16 वर्षीय मुलानं शर्यतीत पराभूत झाल्यानंतर आत्महत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्यानं यासंदर्भात माहिती दिली.
हिंगणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं की, “16 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत पराभव झाल्यानंतर निखिल घरी परतला. दहावीचा विद्यार्थी तणावाखाली होता आणि शनिवारी (17 डिसेंबर) सायंकाळी त्यानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. शर्यत हरल्यानंतर तो खूप अस्वस्थ होता. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.”

Leave a Reply